औरंगाबाद- शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी दुपारी १ वाजता शेतकर्यांचे कर्ज माफ करावे.तसेच सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन जाहिरातबाजी केली आहे.शेतकर्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. अशा आशयाचे निवेदन दिले होते. त्यावर प्रतिक्रया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली होती. रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवेंना कर्जमाफीच्या विषयावर चर्चेसाठी खुले आव्हान दिले आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे
रावसाहेब दानवेंनी मी दिलेल्या पुरावे
खोटे आहेत असे सिद्ध करून दाखवावे. भाजपचे नेते नुसते घोषणा करतात त्या घोषांनपैकी
एकही काम त्यांनी आजवर पूर्ण केले का ? केले
असेल तर हिम्मत असेल तर समोरा-समोर चर्चेसाठी या मी तुमच्याशी कुठेही चर्चेसाठी
तयार आहे. असे आव्हान अंबादास दानवे यांनी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना केले आहे.
दानवे पुढे म्हणाले की दिलेले पुरावे हे सरकारी आकडेवारीला धरून आहेत. जर ते खोटे
असतील तर तुम्ही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांची नावे जाहीर
करा, किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची
आकडेवारी तुम्ही दाखवा मी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे आणि आकडेवारी
तुम्हाला दाखवतो.
















